Hadapsar Fire Incident: हडपसर माळवाडीतील विहार कॉलनीत भीषण आग; आठ पत्र्यांची घरे जळून खाक, सिलेंडर स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण

हडपसर माळवाडीतील विहार कॉलनीत पत्र्यांच्या घरांना भीषण आग; आठ कुटुंबांचा संसार जळून खाक, सिलेंडर स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण
Eight homes gutted in a massive fire in Hadapsar

Eight homes gutted in a massive fire in Hadapsar

Sakal

Updated on

हडपसर : माळवाडी येथील विहार कॉलनीतील पत्र्यांच्या घराला अचानक भीषण आग लागल्याने आठ घरे जळून खाक झाली. या आगीत एका घरातील सिलेंडरचा स्फोटही झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com