Post Office : हडपसर टपाल कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर

भोसले गार्डन येथील टपाल कार्यालयाचे गाडीतळ येथील महापालिकेच्या बंटर शाळेतील इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते नुकतेच या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
Post Office
Post OfficeSakal

हडपसर : भोसले गार्डन येथील टपाल कार्यालयाचे गाडीतळ येथील महापालिकेच्या बंटर शाळेतील इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते नुकतेच या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. डाक विभाग निदेशिका सिमरन कौर, प्रवर डाक अधीक्षक डॉ. अभिजित इचके, मारूती तुपे यावेळी उपस्थित होते.

नवीन टपाल कार्यालयाची जागा हडपसर उपनगराच्या मध्यवर्ती ठिकाणी आल्याने टपाल कार्यालयाशी संबंधित नागरिकांना सोयीचे झाले आहे. सार्वजनिक वाहतूक तळ येथे असल्याने टपालकार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व भागातील नागरिकांना थेट येथे प्रवास करणे सोपे झाले आहे. पार्किंगचा मोठा प्रश्नही मिटला आहे. इतर आवश्यक सुविधाही चांगल्या असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये म्हणाले, "नागरिक व टपाल कार्यालयाचे नाते भावनिक व विश्वासाचे आहे. डाक विभागाच्या डाक जीवन विमा, इंटरनेट बँकिंग, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि रजिस्टर, पार्सल बुकिंग आदी योजनांनी हे नाते नव्या पिढीशी दृढ होत आहे.' श्रीमती कौर यांनी यावेळी टपालकार्यालयांतर्गत दिल्या जाणाऱ्या महिला सन्मान योजना, सुकन्या समृद्धी योजना आदी विविध बचत योजनांची माहिती दिली.

"यापूर्वी असलेल्या भोसले गार्डन येथील कार्यालयाला अपुऱ्या जागेसह विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. नव्याने स्थलांतरित कार्यालयाची जागा व पार्किंग प्रशस्त आहे. कर्मचाऱ्यांसह कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी चांगली बैठक व्यवस्था आहे.

पाणी, स्वच्छतागृह आदी भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. आधार नोंदणी व लिंकिंगसह टपाल कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा येथून दिल्या जात आहेत,' अशी माहिती टपाल खात्याचे उपविभागीय निरिक्षक योगेश वीर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com