Hadapsar News: हडपसर स्थानकावर ‘डिजिटल’ सिग्नल यंत्रणा; रेल्वे प्रशासनाचा निर्णय, परिचालन अधिक सुरक्षित अन् गतिमान होणार
Hadapsar Railway Station: हडपसर रेल्वे स्थानकावरील सिग्नल यंत्रणा आता पूर्णतः संगणकीकृत झाली आहे. यामुळे रेल्वे गाड्यांचे गतीमान व सुरक्षित परिचालन शक्य होणार आहे. या यंत्रणेमुळे नवीन रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे : हडपसर स्थानकावरची सिग्नल यंत्रणा ही आता आधुनिक झाली आहे. रविवारी (ता. २०) १८ तासांचा ब्लॉक घेऊन संगणकीकृत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. शिवाय ‘लूप लाइन’ला मुख्य लाइनशीदेखील जोडण्यात आले.