Pune Crime
sakal
पुणे
Pune Crime: तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; हडपसरमध्ये फटाके वाजविण्यावरून दोन गटांत हाणामारी
Crime News: हडपसरच्या रामटेकडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या वादातून झालेल्या हाणामारीत जितेंद्र ठोसर यांचा मृत्यू. पोलिसांनी एकाला अटक केली.
पुणे : फटाके वाजविताना झालेल्या वादातून हडपसरमधील रामटेकडीत दोन गटांत हाणामारी झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

