पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने हडपसर येथील माधवराव तुपे विद्यालयात ‘इंग्लिश कार्निव्हल’चे उत्साहात आयोजन करण्यात आले. .Premium|Study Room: दयानंद विज्ञानमध्ये ' स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करायची ' या विषयावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन.महापालिका व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचे कार्यात्मक इंग्रजी कौशल्य विकसित करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल आत्मविश्वास आणि उत्सुकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता..या कार्निव्हलमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून विविध शैक्षणिक उपक्रमांचे चार स्टॉल्स उभारले होते. ‘हॉट सीट’ उपक्रमातून चित्रांच्या आधारे शब्दसंग्रह वाढविण्यात आला, तर ‘रिंग गेम’द्वारे विद्यार्थ्यांनी वस्तूंविषयी इंग्रजीत बोलण्याचा सराव केला..शब्द शिकण्याची संधी‘ऑपोजिट एटीएम’मुळे विरुद्धार्थी शब्द शिकण्याची संधी मिळाली, तर ‘वर्ड सर्च’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शब्दसंग्रह वाढविण्याचा आनंददायी अनुभव घेतला. याशिवाय विद्यार्थ्यांनी इंग्रजी नाटिका सादर केली तसेच इंग्रजी गाण्यावर नृत्य सादर करून भाषेतील त्यांचा वाढता आत्मविश्वास दर्शविला..कार्यक्रमाला शिक्षण विभागाच्या उपप्रशासकीय अधिकारी शिल्पकला रंधवे प्रमुख पाहुण्या म्हणून, तर अधिकारी ज्योती राजपूत, मुख्याध्यापक, पालक तसेच परिसरातील शाळांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. नगरसेविका पायल तुपे यांनी कार्निव्हलला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले..पहिले अक्षर फाउंडेशनच्या प्रयत्नांतून व झेन्सार टेक्नॉलॉजीज यांच्या आर्थिक सहकार्यामुळे हा उपक्रम साकार झाला असून भाषा शिक्षण अधिक आनंददायी, समावेशक आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.