

हडपसर : येथील नागरी वन उद्यानामध्ये आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी आग लावून पॅगोडा जाळल्याची धक्कादायक घटना घडली
Sakal
हडपसर : काळे बोराटे नगर येथील नागरी वन उद्यानामध्ये आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी आग लावून पॅगोडा जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नागरिकांना बसण्यासाठी आणि विश्रांतीसाठी उभारण्यात आलेला हा पॅगोडा पूर्णतः जळून खाक झाला आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.