दादाजी धाम पायी दिंडीचे 
आंबेगावात जल्लोषात स्वागत

दादाजी धाम पायी दिंडीचे आंबेगावात जल्लोषात स्वागत

Published on

मंचर, ता. १८ : “श्री. क्षेत्र दादाजी धाम हडपसर ते श्री क्षेत्र दादाजी धाम खांडवा (मध्य प्रदेश) या पायी दिंडी सोहळ्याचे मंचर-अवसरी फाटा(ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. १७) रात्री आंबेगाव तालुक्यातील भाविकांनी जल्लोषात स्वागत केले. स्वामी शिवानंद दादाजी प्रतिष्ठान पुणे यांनी आयोजित केलेल्या पायी दिंडीतील भक्तजन तब्बल सातशे किलोमीटरचा प्रवास करणार आहेत,” अशी माहिती पायी दिंडीचे आंबेगाव तालुक्याचे संयोजक आत्माराम महाराज बोऱ्हाडे व कृष्णांत शिंदे यांनी दिली.
अवसरी फाटा येथील विघ्नहर मंगल कार्यालयाचे मालक राजू भोर,पत्नी स्वाती भोर व किसनराव भोर यांनी श्री. धुनिवाले केशवानंद दादाजी व श्री. हरी हरजी भोले भगवान यांच्या प्रतिमेचे व माउली ताई यांचे पूजन केले. धनंजय सरकार, माउली ताई, द्वारका मय्या माता यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला.
वारकऱ्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था भोर परिवाराने केली. शिवप्रसाद दिवटे यांनी सादर केलेल्या भक्ती संगीताला भाविकांनी दाद दिली. एकलहरे-नीलायम मंगल कार्यालय नारायणगाव येथे संजय वारुळे व पिंपळवंडी चौदा नंबर येथे अक्कलकोट स्वामी समर्थ विसावा मंदिरात नाना शिंदे यांनी पायी दिंडीचे स्वागत व मुक्कामाची व्यवस्था केली. आळेफाटा, चंदनपुरी घाट, पळस खेडे, नांदूर, निफाड पिंपळगाव बसवंत, सटाणा-शेणपूर फाटा, कुसुंबा, साक्री, कुंडाणे, वनी, अमळनेर, निमगव्हाण (ता. चोपडा), रावेर बोरगाव मार्गे शुक्रवारी (ता. १३ फेब्रुवारी) श्री दादाजी धाम (खांडवा मध्यप्रदेश) येथे दिंडीचा सांगता समारंभ होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त शनिवारी (ता.१४ फेब्रुवारी) श्री धुनी वाले दादाजी यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीचे आयोजन खांडवा येथे केले आहे, असे कृष्णांत शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com