banana tree collapse by hailstorm
sakal
वडगाव निंबाळकर - वडगाव निंबाळकर (ता. बारामती) परिसरात रविवारी (ता. ३१) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले. गारांच्या तडाख्यामुळे केळी, पेरू व अन्य फळपिकांना मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.