गुड न्युज! पुण्यात रविवारपासून सुरू होणार हेअर सलुन, ब्युटी पार्लर; पण 'या' आहेत अटी

Hair salon beauty parlor will start from Sunday in the district
Hair salon beauty parlor will start from Sunday in the district

पुणे : जिल्ह्यात रविवार (ता. 28) पासून केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर सुरू होणार आहेत. परंतु हे सुरू करताना संबंधित व्यावसायिक आणि ग्राहकांना अटी शर्तींचे पालन करावे लागणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात या व्यवसायाला अद्याप बंदीच असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने राज्य सरकारने 25 जूनच्या आदेशानुसार केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी अटी व शर्तींच्या अधीन परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रात, नगरपंचायत, नगर पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, तसेच छावणी परिषद हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रामध्ये केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्यूटी पार्लर सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या अटी शर्तींचे पालन करावे लागणार : 
- सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी 
- केस कापणे, केसाला रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंगला परवानगी परंतु त्वचेशी संबंधित सेवांना परवानगी नाही
- कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अॅप्रन मास्क, सॅनिटायझर अशा संरक्षक साधनांचा वापर करणे आवश्यक
- प्रत्येक सेवेनंतर खुर्ची स्वच्छ, निर्जंतूक करणे आवश्यक
- दुकानातील संपूर्ण जागा, फरशी प्रत्येक 2 तासांनी स्वच्छ, निर्जंतूक करावी
- वापर झाल्यानंतर विल्हेवाट लावता येईल, अशा टॉवेल्स, नॅपकिन्सचा वापर करावा 
- प्रत्येक सेवेनंतर उपकरणे स्वच्छ, निर्जंतुकीकरण करावीत
- सेवा देणारा व सेवा घेणारा सोडून इतर व्यक्तींमध्ये तीन फुटाचे अंतर बंधनकारक 
- मास्क, रूमाल नाका-तोंडाला झाकून ठेवणे आवश्यक
- दुकानामध्ये सॅनिटायझर, हॅन्डवॉश, साबण व इतर हात धुण्याचे साहित्य ठेवणे बंधनकारक 
- ग्राहकांना केवळ अपॉईंटमेंट घेऊनच येण्यास कळवावे 
- ग्राहक विनाकारण दुकानामध्ये वाट पाहत राहणार नाही, याची सलून मालकांनी दक्षता घ्यावी.
- प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबतची माहिती दुकानाच्या दर्शनी भागात ठळक स्वरुपात लावावी
- अटींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक, कायदेशीर कार्यवाही करुन परवानगी रद्द 
- आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समूह शिक्षेस पात्र राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com