माणच्या सुपुत्राची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड
ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी
माणच्या सुपुत्राची निवड
शिरवलीच्या हणमंत जगदाळे यांना संधी; मान्यवरांकडून अभिनंदन
दहिवडी, ता. २४ : माण तालुक्यातील शिरवली या गावाचे सुपुत्र हणमंत जगदाळे यांची ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
हणमंत जगदाळे हे ठाणे महापालिकेच्या नगरसेवकपदी विक्रमी सलग सहाव्यांदा निवडून आले आहेत. महानगरपालिकेच्या सभागृहातील ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे ज्येष्ठ, अभ्यासू व विकासाची दृष्टी असणारे सदस्य आहेत. त्यांच्या कार्याची योग्य दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली आहे.
या निवडीबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी हणमंत जगदाळे यांचा सत्कार केला. यावेळी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्यासह शिवसेनेचे राज्य सचिव व स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, शिवसेना गटनेते नगरसेवक पवन कदम, नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
...........
कोट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी गटनेतेपदी निवड केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आणि सभागृहाचे शिस्तबद्ध कामकाज यांचा संगम साधेन. धोरणात्मक निर्णयांच्या केंद्रस्थानी राहून ठाणे शहराच्या उन्नतीसाठी सभागृह नेतेपदाद्वारे सदैव कार्यरत राहीन.
- हणमंत जगदाळे, सभागृह नेते, ठाणे महानगरपालिका.
..........
फोटो
07309
ठाणे : महापालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड झाल्याबद्दल हणमंत जगदाळे यांचा सत्कार करताना शर्मिला पिंपळोलकर, यावेळी उपस्थित मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

