हनुमान मंदिराची दुरुस्ती व रंगकाम जयंती पूर्वी पूर्ण करण्याची मागणी

हनुमान मंदिराची दुरुस्ती व रंगकाम जयंती पूर्वी पूर्ण करण्याची मागणी

Published on

MGV26B15439
मंगळवेढा : शहरातील हनुमान मंदिराची दुरुस्ती व रंगकाम हनुमान जयंतीपूर्वी पूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन देताना पदाधिकारी.
---
हनुमान मंदिराची दुरुस्ती करण्याची मागणी
मंगळवेढा : शहरातील बाजार चौकातील सिटी सर्व्हे क्रमांक ३१८६ मधील हनुमान मंदिराची दुरुस्ती व रंगकाम हनुमान जयंतीपूर्वी पूर्ण करण्याची मागणी मारुती परिवाराच्या वतीने नगराध्यक्षा सुनंदा आवताडे व उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत यांच्या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मारुती परिवाराचे ज्येष्ठ अरुण वाघ, दिगंबर यादव, भाजप शहराध्यक्ष नागेश डोंगरे, प्रशांत मोरे, रावसाहेब कोंडूभैरी, राम काळुंगे, श्‍यामराव होनमाने, औदुंबर डांगे आदी उपस्थित होते. शहरातील मुख्य चौकात असलेले हनुमान मंदिर फार पुरातन काळापासून आहे. सकाळच्या सत्रात या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com