Bhor News : कुस्तीमध्ये करिअर घडविण्याचे अमिष दाखवून कुस्तीपट्टू तरुणीचे लैंगीक सोशन

कुस्तीमध्ये करिअर घडविण्याचे आणि लग्नाचे अमिष दाखवून कुस्तीपट्टू तरुणीचे लैंगीक सोशन केल्याबद्दल भोरमधील नामांकित कुस्ती संकुलाचा संचालक व प्रशिक्षक यास भोर पोलिसांनी अटक केली.
wrestling women
wrestling womenSakal

Bhor News : कुस्तीमध्ये करिअर घडविण्याचे आणि लग्नाचे अमिष दाखवून कुस्तीपट्टू तरुणीचे लैंगीक सोशन केल्याबद्दल भोरमधील नामांकित कुस्ती संकुलाचा संचालक व प्रशिक्षक यास भोर पोलिसांनी अटक केली.

सुनिल विठ्ठल शेटे (वय-५३. रा. संजयनगर भोर) असे अटक केलेल्या कुस्तीप्रशिक्षकाचे नाव असून त्याने मागील चार महिन्यांमध्ये २१ वर्षीय महिला कुस्तीपट्टूस वेगवेळ्या ठिकाणी नेवून शारिरीक संबंध ठेवले.

संबंधीत तरुणीने शुक्रवारी (ता.२९) भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याबाबत भोरचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी दिलेली माहिती अशी ः आरोपी सुनिल शेटे याने २१ वर्षीय कुस्तीपट्टू तरुणीला लग्नाचे आणि कुस्तीत करिअर घडविण्याचे अमिष दाखविले.

आणि डिसेंबर २३ ते मार्च २४ या कालावधीत भोर, महाबळेश्वर येथील हॉटेल रेनफॉरेस्ट आणि सातारा जिल्हा परीसरातील लॉजवर चारचाकी मोटारीतून घेवून जाऊन जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. तसेच सदर प्रकार कोणास सागीतला तर तुझे करीयर बरबाद होईल अशी धमकी दिलेली आहे.

याशिवाय मोटारीतून कुस्ती संकुल येथे घेवून येताना वेळोवेळी तिचा विनयभंगही केला आहे. अशा आशयाची फिर्याद पिडीत तरुणीने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सुनिल शेटे यास शुक्रवारी सायंकाळी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक शिला खोत पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com