

फोटो ः मृणाल कुलकर्णी
ॲड. विजय सावंत
आनंद सराफ
-------------
हरिभाऊ साने जीवनगौरव पुरस्कार
कुलकर्णी, सावंत, सराफ यांना जाहीर
पुणे, ता. १२ ः क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनगौरव पुरस्कार कला, क्रीडा व सामाजिक कार्य विभागात अनुक्रमे ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ॲड. विजय सावंत आणि आनंद सराफ यांना जाहीर झाला आहे.
कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षे विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यंदाच्या या अठराव्या पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजी कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम येत्या रविवारी (ता. १५) सायंकाळी सहा वाजता कर्वे रोड येथील अश्वमेध कार्यालयात होणार आहे.
‘कला’ विभागातील पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मृणाल कुलकर्णी यांना ‘क्रीडा’ विभागाचा पुरस्कार पुणे जिल्हा हौशी मुष्टियुद्ध संघटनेचे अध्यक्ष ॲड. विजय सावंत यांना, तर सामाजिक बांधिलकी, सैनिकांविषयी कृतज्ञता या माध्यमातून कार्यरत असणारे आनंद सराफ यांना ‘सामाजिक कार्य’ पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल ,श्रीफळ, रोख रक्कम असे आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब साने व कार्यवाह सुनील नेवरेकर यांनी दिली.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.