टेमकरमळ्यात शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक

टेमकरमळ्यात शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक

Published on

मंचर, ता. ४ :अवसरी खुर्द-टेमकरमळा (ता. आंबेगाव) येथे देवी आई अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात झाला. सप्ताह सांगतेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काढण्यात आलेली सवाद्य मिरवणुक लक्षवेधक ठरली. अग्रभागी टाळकरी महिला होत्या. पाच हजार भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेला पुरणपोळीचा बेत व संत विभूतींची आकर्षक रांगोळी ही या सप्ताहाची प्रमुख वैशिष्ठ्ये ठरली.
स्वानंद सुख निवासी गुरुवर्य दिवंगत कोंडाजी बाबा डेरे यांच्या प्रेरणेने व शांतिब्रह्म परमपूज्य मारुतीबाबा महाराज कुऱ्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली टेमकरमळा येथील पुरातन देवी आई मातेच्या मंदिरात शनिवार (ता. २७ डिसेंबर) ते शनिवार (ता. ३) या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकऱ्यांनी दुर्गा सप्तशती पठण केले.
चंद्रकांत महाराज खळेकर, चैतन्य महाराज देगलूकर, शिवा महाराज बावस्कर, अमृत महाराज जोशी, महादेव महाराज राऊत, जयवंत महाराज बोधले, कुऱ्हेकर यांची कीर्तनरूपी सेवा व डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांचे काल्याचे कीर्तन झाले.
सप्ताहकाळात दररोज अलका टेमकर व विलास महाराज टेमकर यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व बाळासाहेब महाराज खरमाळे, यतीन कुलकर्णी, दीपक महाराज ठेबेकर, गौरव महाराज शिंदे, नाना महाराज इंदोरे, साहेबराव महाराज कामठे यांची प्रवचनरूपी सेवा झाली. विमल भोर, सुरेश टेमकर, पृथ्वीराज टेमकर यांच्यासह भाविकांनी तुळशीची माळ घालून अनुग्रह स्वीकारला.
ज्योती टेमकर, रसिका टेमकर व हर्षदा टेमकर यांनी संत विभूतींची व्यक्तिचित्रे आकर्षक रांगोळीद्वारे साकारली. वेताळेश्वर प्रासादिक भजनी मंडळ, शिंदेमळा यांनी काकड आरतीची व्यवस्था पाहिली. प्रवीण टेमकर, सुरेश टेमकर, गणपत टेमकर, विवेक टेमकर, वसंत टेमकर, नीलेश टेमकर, केशव टेमकर व ग्रामस्थांनी व्यवस्था पाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com