esakal | Pune : तळजाई टेकडीवर पर्यावरणाचा संदेश देत 'हरित दांडी यात्रा'
sakal

बोलून बातमी शोधा

pune

तळजाई टेकडीवर पर्यावरणाचा संदेश देत 'हरित दांडी यात्रा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महात्मा गांधी जयंती निमित्ताने तळजाई टेकडीवर शनिवारी सकाळी तळजाई वाचवा पर्यावरणाचे संवर्धन करा असा संदेश ' देत ''हरित दांडी यात्रा' काढण्यात आली. पुण्यातील ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीवर १०७  एकर जागेत विकासाच्या नावावर तब्बल १२० कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचे जंगल करण्याचा घाट असल्याने तळजाई टेकडीवरील प्रस्तावित जैवविविधता वसुंधरा प्रकल्प होणार असून येथील प्रस्तावित बांधकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार व जमीन सपाटीकरण होणार, अनेक प्राणी, पक्षी यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणार आहे.यामुळे

याप्रकल्पास निसर्गप्रेमी विरोध दर्शविला. तळजाई टेकडीवर तळजाई मंदिर ते कैं. सदू शिंदे स्टेडियम पर्यंत गांधीजींच्या वेशभूषेत आणि प्राणी, पक्षी, आणि झाडांच्या प्रतिकृतीत हि प्रबोधनात्मक 'हरित दांडी यात्रा' काढण्यात आली. तळजाई टेकडीची जैवविविधता नैसर्गिकदृष्ट्या जशी आहे तशी राहावी, असे पर्यावणप्रेमींना वाटत आहे. पुण्यातील ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीची ओळख पुसली जाण्याची भिती निर्माण होत आहे.

त्यामुळे माय अर्थ फांउडेशनतर्फे आणि पर्यावरणप्रेमी संस्थेंच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले.यावेळी माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, जैवविविधता अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर, महा एनजीओचे मुकुंद शिंदे, इन्वार्मेंट क्लब ऑफ इंडीयाचे ललित राठी, जिवित नदी संस्थेच्या स्वाती डुबे, प्राणी सेवा संस्थेचे अ‍ॅड. अमित शहा, सोमनाथ पाटील, विजय जोरी, श्रीकांत मेमाणे, सुशील बोबडे, राज सिंग,एस. कार्लेकर इ. उपस्थित होते. यावेळी डॉ. सचिन पुणेकर (जैवविविधता अभ्यासक )

म्हणाले, आधीच तळजाईचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच संपुर्ण शहराला नैसर्गिक ऑक्सिजन पुरवठा करणारी तळजाई टेकडी ही पुणेकरांची शेवटची आशा आहे. याठिकाणी अनेक स्थानिक दुर्मिळ पक्षी आणि अनेक वृक्षांच्या प्रजाती आहेत. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करायचे सोडून प्रशासन विकास प्रकल्पांना वेगवेगळी गोंडस नावे देऊन प्राणी, पक्षी, झाडे यांच्या मुळावर उठले आहे.

यावेळी अनंत घरत (अध्यक्ष,माय अर्थ फांउडेशन)म्हणाले, विकासाच्या नावावर असेच सिमेंट कॉंक्रीटीकरण होत राहिले तर भविष्यात आपल्याला फक्त उद्यानांच्या सिमाभिंतीवर पक्षी आणि प्राण्यांचे चित्रे दिसतील. येथे होणाऱ्या सिमेंटच्या जंगलामुळे निसर्ग, पक्षी, प्राणी सगळ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहेत. त्यामुळे या टेकडीवर कृत्रिम जैवविविधता उभारण्याची गरज काय आहे? येथील जैवविविधता नैसर्गिकदृष्ट्या जशी आहे तशी राहावी.

loading image
go to top