पुणे : ‘‘जलजीवन योजनेचे दीड कोटी रुपयांचे काम करूनही हर्षल पाटील या युवा कंत्राटदाराला सरकारने बिल दिले नाही. त्यामुळे त्याने जीवन संपविले आहे. त्यामुळे त्याची आत्महत्या नसून खून आहे. त्याला सरकारच जबाबदार आहे,’’ अशी टीका आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस रोहित पवार यांनी सरकारवर केली.