#कारणराजकारण : आमच्याकडे हर्षवर्धन पाटलांचं एक गुपित आहे...

हर्षदा कोतवाल
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मंडळी, आम्हाला एक गुपित कळलंय.. तसं ते जग जाहीरच आहे पण तरीही... काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. पण, जे सर्वांना माहीत नाही ते गुपित आता ऐका, भाजपच्या इंकमिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पाटलांचं नाही तर चक्क दत्तात्रय भरणेंचं नाव आहे.

इंदापूर (पुणे) : मंडळी, आम्हाला एक गुपित कळलंय.. तसं ते जग जाहीरच आहे पण तरीही... काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. पण, जे सर्वांना माहीत नाही ते गुपित आता ऐका, भाजपच्या इंकमिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पाटलांचं नाही तर चक्क दत्तात्रय भरणेंचं नाव आहे.

एकीकडे इंदापूरच्या राजकारणाचे वारसदार हर्षवर्धन पाटील तर दुसरीकडे बारामतीची धुरा सांभाळत असलेले अजित पवार. दोघेही सख्खे शेजारी पण एकमेकांचे पक्के वैरी. यांचं एकमेकांशी कधीच जुळलं नाही, असं लोक म्हणतात. लाख तडजोडी केल्या, अनेकवेळा मन मारलं, स्वतःचा, कार्यकर्त्यांचा स्वाभिमान दुखावला.. आता मात्र पाणी डोक्यावरून गेलंय असं जाहीरपणे म्हणत पाटलांनी सरळ काँग्रेस सोडण्याचा निर्णय जवळपास फिक्स केला. 

 

इंदपूरभर चर्चा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वासघात केला आणि म्हणून पाटलांनी भाजपची वाट धरली आणि तीसुद्धा बिनशर्त. कारण वेळच अशी आलीये की त्यांना दुसरा पर्यायच उरलेला नाही. मात्र जर तडजोड झालीच आणि पाटलांना इंदापूरमधील जागा राष्ट्रवादीने सोडली तर चक्क भरणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. असे झाले नाही तर भरणे अपक्ष म्हणून तर नक्कीच निवडणूक लढवतील.
 

इंदापूरकर म्हणतात, भाजपच्या इंकमिंग लिस्टमध्ये दत्तात्रय भरणे, प्रवीण माने आणि मग तिसरा नंबर येतो तो पाटलांचा. भाजप प्रवीण मानेंना आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी झालंय, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. आता ज्याला तिकिट मिळणार नाही तो भाजपमध्ये जाणार किंवा अपक्ष म्हणून लढणार अशी दाट शक्यता आहे.

एकूणच काय इंदापूरची लढाई तिरंगी होणार असे दिसते. शेवटी बाजी भाजपची की पाटलांची (पवारांची) हे पाहणे मजेशीर ठरेल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshawardhan Patil from Congress has a new equation about Indapur constituency for vidhansabha 2019