हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या खास शब्दात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील sakal

इंदापूर : भारतीय संस्कृती मध्ये दिपावली सणास सणांचा राजा म्हटले जाते. त्यामुळे कोरोना महामारीच्या सावटाखाली जगणाऱ्या संपूर्ण मानवजातीस या सणापासून सकारात्मकऊर्जा मिळू दे,संपूर्ण जग सुखी व समाधानी होऊ दे अशी प्रार्थना देवाकडे करून भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

हर्षवर्धन पाटील यांनी दिवाळी सणानिमित्त परंपरे प्रमाणे इंदापूर येथे भाग्यश्री बंगल्यात सहकुटुंब लक्ष्मी पूजन केले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यावेळी उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील
दीप प्रज्वलन करत जो बायडेन यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले,

सद्या कोरोना महामारीचा संसर्ग कमी झाला असला तरी सर्वांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी, प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी तसेच दिपावली उत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करावे, असे आवाहन शेवटी हर्षवर्धन पाटील केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com