विजतोडल्यामुळे MSEB कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांचे ठिय्या आंदोलन

इंदापूर तालुका भाजपाच्या वतीने दि.२७ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या शेतीचे वीजजोड तातडीने जोडावी यासाठी धरणे आंदोलन कडाक्याच्या थंडीत सुरू आहे
विजतोडल्यामुळे MSEB कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांचे ठिय्या आंदोलन
विजतोडल्यामुळे MSEB कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांचे ठिय्या आंदोलन sakal media
Updated on

इंदापूर : इंदापूर तालुका भाजपाच्या वतीने दि.२७ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या शेतीचे वीजजोड तातडीने जोडावी यासाठी धरणे आंदोलन कडाक्याच्या थंडीत सुरू आहे. रात्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व इतर प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांबरोबर भाकरी, पिठलं व ठेचाखात तेथेच झोप काढत आंदोलनाची व्याप्ती वाढविली. त्यानंतर महावितरण कार्यालय प्रांगणात त्यांनी सर्व शेतकऱ्यांसमवेत ठिय्या आंदोलन सुरू केले.

विजतोडल्यामुळे MSEB कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांचे ठिय्या आंदोलन
साहा-अय्यरच्या अर्धशतकाचा 'सहारा'; किवींसमोर तगडे लक्ष्य

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेली ११ दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला आहे. त्यामुळे भाजपा नेते व मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील महावितरण कार्यालयासमोर सकाळ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत चालू होई पर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन चालूच राहील, असे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी आहे. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी पाटील व जगदाळे यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला.

विजतोडल्यामुळे MSEB कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांचे ठिय्या आंदोलन
सर्वपक्षीय बैठकीला मोदींची दांडी; कृषी कायद्यांबाबत काँग्रेसला शंका!

दरम्यान, तहसिलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक टी.वय. मुजावर यांच्या उपस्थितीत दि.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हर्षवर्धन पाटील,आप्पासाहेब जगदाळे व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक अयशस्वी ठरली. यावेळी पाच हफ्ते भरल्याशिवाय वीज सुरू केली जाणार नाही असा पवित्रा वीज वितरण अधिकाऱ्यांनी घेतला तरराज्याचे वीज मंत्री यांच्या तालुक्यास व इंदापूर तालुक्यास वेगळे धोरण का या पाटील यांच्या म्हणण्यावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी निरुत्तर झाले. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com