दौंड : गिरीम येथे तब्बल 21 लाखांचा गांजा जप्त 

दौंड : गिरीम येथे तब्बल 21 लाखांचा गांजा जप्त 
Updated on

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील गिरीम येथे गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यास अटक करून त्याच्याकडील 21 लाख रूपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पुढाकाराने ही मोठी कारवाई करण्यात आली. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी याबाबत माहिती दिली. ५ जून रोजी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना गिरीम येथे गांजाची शेती केली जात असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस कारवाईचे आदेश दिले. गिरीम येथील शिंदे वस्ती येथे सायंकाळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दत्तू शंकर शिंदे (वय ४७, रा. शिंदे वस्ती, गिरीम) यास ताब्यात घेण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिंदे याने स्वतः च्या रानात ४ गुंठे क्षेत्रात सहज लक्षात येणार नाही, अशा पध्दतीने गांजाची शेती केली होती. पोलिस पथकाने शेतातील गांज्याची झाडे उपटून जप्त केली. सदर कारवाईत गांजाची १७३ झाडे आणि विक्रीसाठी ठेवलेल्या सुक्या स्वरूपातील १४० किलो गांजा, असा एकूण २१ लाख ०१ हजार ५०० रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दौंड उपविभागाच्या उपअधीक्षक (आयपीएस) ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सुनील महाडीक, सहायक निरीक्षक दत्तात्रेय गुंड, दत्तात्रेय जगताप, रवीराज कोकरे, हवालदार अनील काळे, सचिन गायकवाड, रऊफ इनामदार, उमाकांत कुंजीर, महेश गायकवाड, नीलेश कदम, काशिनाथ राजापुरे,  पोलिस नाईक गुरूनाथ गायकवाड, सुभाष राऊत, चंद्रकांत जाधव, कॅान्स्टेबल समाधान नाईकनवरे, आदींनी भाग घेतला. दौंड पोलिस ठाण्याचे हवालदार कल्याण शिंगाडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Artificial Intelligence, ChatGPT, Gemini, and Generative AI are transforming education, business, marketing, and digital content creation worldwide.
MNS opposed the Pune Municipal Corporation's proposal to lease prime Kothrud land without a public tender to a welfare foundation.
33 Gunthas, Thousands of Roses, and a Success Story Inspiring Maharashtra Farmers
Krushiratna Anil Meher received the Yash Jeevan Gaurav Award 2026 for excellence in agriculture, rural development, and farmer empowerment.
Marathi News Esakal
www.esakal.com