

Dignitaries distribute government certificates to citizens and students at the Samadhan Camp in Theur.
Sakal
सुनील जगताप
थेऊर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून,पंचायत समिती हवेली व अप्पर तहसील कार्यालय हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान'अंतर्गत विशेष ‘समाधान शिबिराचे’ आयोजन, शुक्रवारी (दि. ३१) रोजी थेऊर येथील,आशीर्वाद बँक्वेट हॉल सभागृहात करण्यात आले.या शिबिरात विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल दिन प्रथमच ग्रामीण भागात अभियान स्वरूपात साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.