डाळजचा उरूस यंदा साध्या पद्धतीने
पळसदेव, ता. १ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील डाळज येथील ग्रामस्थांनी यंदाचा हजरत वाघसवार बाबा उरूस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या येथील हजरत सय्यद राजवाघसवार बाबा यांचा मंगळवारी (ता. १०) उरुस आहे.
या पार्श्वभूमीवर यात्रा समिती आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली. यामध्ये यंदा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना फाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा केवळ धार्मिक विधी आणि परंपरांचे पालन केले जाणार आहे. कुस्त्या, फटाक्यांची आतषबाजी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

