
पुणे : कस्पटे चौक (वाकड) ते बालेवाडी दरम्यानचा मुळा नदीवरील पूल तातडीने खुला करा, तसेच पूलाला जोडणाऱ्या सेवा रस्त्यांसाठी पुणे महापालिकेने तातडीने निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला दिला आहे. त्यामुळे किमान उच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर तरी आता मागील पाच वर्षांपासून पडून असलेला पूल वाहतूकीसाठी सुरू करण्यासाठी महापालिका तातडीने हालचाली करण्याची शक्यता दिसू लागली आहे.