HCMTR Project: एचसीएमटीआर प्रकल्पामुळे पुण्यात हजारो कुटुंबे विस्थापित होणार? ३ हजार झाडे, टेकड्या-तलावांवर परिणामाची भीती; नागरिकांचा विरोध

एचसीएमटीआरमुळे हजारो झाडे, टेकड्या आणि तलावांवर गदा; विस्थापनाच्या संकटात हजारो कुटुंबे, नागरिक कृती समितीची पारदर्शक जनसुनावणी व संयुक्त बैठकीची मागणी
Citizens raise environmental concerns over Pune’s HCMTR project.

Citizens raise environmental concerns over Pune’s HCMTR project.

Sakal

Updated on

पुणे : गेल्या ४० वर्षांपासून कागदावर असलेला उच्च द्रूतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) प्रकल्पाच्या निविदा पुढील दोन ते तीन महिन्यांत काढून, पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा चंग प्रशासनाने बांधला आहे. मात्र, त्यात आता विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. एचसीएमटीआरसाठी हजारो झाडे तोडली जाणार असून, टेकडी फोड होणार आहे, नागरिकांना बेघर होण्याचा धोका आहे. या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून, या प्रकल्पाचा फेरविचार करावा अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. तसेच आयुक्तांनी यासंदर्भात संयुक्त बैठक नागरिकांसोबत घ्यावी अशी मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com