Ganpati Idol Making Shinde Family
Ganpati Idol Making Shinde Familysakal

Nirgudsar News : वीटभट्टीचा कामासाठी आले, पण गणेश मूर्तिकार बनले

शिंदे कुटुंब वीटभट्टीचा कामासाठी आले खरे, पण गणपती मूर्ती बनवण्याचा कसलाही मागमूस नसताना देखील संपूर्ण कुटुंब गणपती मूर्तिकार बनले.
Published on

निरगुडसर - शिंदे कुटुंब वीटभट्टीचा कामासाठी आले खरे पण गणपती मूर्ती बनवण्याचा कसलाही मागमूस नसताना देखील संपूर्ण कुटुंब गणपती मूर्तिकार बनले आहे. सुनिता मोहन शिंदे व छाया प्रकाश शिंदे या सख्ख्या जावांनी १० वर्षापूर्वी गणपती बनवण्याचा कारखाना उभारला असून, संपूर्ण कुटुंबच वर्षभर गणपती बनवण्यात व्यस्त असते. दरवर्षी ५ हजार गणेशमूर्ती घडवल्या जात असून जिद्द, चिकाटी आणि एकजूट असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो हे शिंदे कुटुंबाने आज दाखवून दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com