हवेलीतील आरोग्य साहय्यकाचा कोरोना संसर्गाने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

-तालुक्यात दिवसभरात १०३ नवीन रुग्ण ; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३०३८ झाली आहे.

खडकवासला : सांगरुण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक शैलेश चंद्रकांत चव्हाण ( वय ५४ ) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते सध्या खेड शिवापूर परिसरात नियुक्तीला होते. तालुक्यात अन्य दोन जणांचा देखील कोरोनाने मुत्यू झाला. हवेली तालुक्यात आज गुरुवारी दिवसभरात तालुक्यात १०३ नवीन रुग्णांची वाढ झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हवेली तालुका आरोग्य सहाय्यक महेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश चव्हाण (वय 54) हे सांगरुण आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक होते. त्यांची नियुक्ती खेड शिवापूर आरोग्य केंद्रात होती. त्यांच्याकडे गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी भागात करण्यात आली होती. या  कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ते कार्यरत होते. त्यावेळी त्यांना संसर्ग झाला. त्यांच्यावर नवले हाँस्पीटल मध्ये तीन आठवड्यापासून उपचार सुरू होते. आज त्यांचा मृत्यू झाला. ते धनकवडी परिसरात राहत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन खरात यांनी पाठविलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात कोंढवे धावडे येथे १२ ,वाघोली येथे  १२ , कदमवाकवस्ती येथे १३ ,नांदेड येथे ४ , नऱ्हे  येथे ८ ,किरकटवाडी येथे ३ ,मांजरी येथे ११  तसेच इतर भागासह तालुक्यात  १०३  रुग्ण सापडले. आता पर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३०३८ आहे त्यापैकी
२२७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health assistant at the mansion dies of corona infection