शिबिर

शिबिर
Published on

PNE26W19662
अहिल्यानगर ः मान्यवरांच्या हस्ते पाठदुखी, मणके विकार तपासणी शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले.

आनंदऋषीजी हॉस्पिटलचा रुग्णसेवेचा
महायज्ञ अखंडपणे सुरू

सीमा शेटीया ः पाठदुखी, मणके विकार तपासणी शिबिरास प्रतिसाद


अहिल्यानगर, ता.१६ ः आचार्य आनंदऋषींजींच्या प्रेरणेने हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात सेवेचे कार्य सुरू आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत रुग्णसेवा मिळावी. यासाठी रुग्णसेवेचा महायज्ञ अखंडपणे सुरू आहे. समाजातील गरजू रुग्णांना मोफत व अल्प दरात रुग्णसेवा मिळावी. यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मार्फत मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे घेतले जातात ही कौतुकास्पद बाब आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलचा रुग्णसेवेचा महायज्ञ अखंडपणे सुरू राहील, असे प्रतिपादन सीमा शेटिया यांनी केले.

आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे पाठदुखी व मणके विकार तपासणी शिबिराचे आयोजन स्व. लक्ष्मीकांतजी शेटिया यांच्या स्मरणार्थ सीमा शेटिया प्रणेश शेटिया, सलोनी शेटिया, प्रतीक्षा शेटिया व शेटिया परिवाराच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी अजित शेटिया, नीलेश छाजेड, सारिका छाजेड, सारिका पारख, गणेश कांकरिया, गौतम चोरडिया, राजेंद्र तातेड, धन्यकुमार बरमेचा, अमोद बोथरा व मित्र परिवार, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, माणकचंद कटारिया, सतीश लोढा, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, सुभाष मुनोत, अभय गुगळे, प्रकाश छल्लाणी, शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर डॉ. भरत जगताप, डॉ. विशाल शिंदे, डॉ. रोहन धोत्रे, डॉ. श्रीकांत दलाल आदी उपस्थित होते.

सलोनी शेटिया म्हणाले, शेटिया परिवाराला आरोग्य शिबिराच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली आहे. हे शेटिया परिवाराचे भाग्य समजते. गणेश कांकरिया म्हणाले, आमचे मित्र स्वर्गीय लक्ष्मीकांत शेटिया यांचे सामाजिक कार्यात नेहमीच योगदान लाभत होते. जीवदया ग्रुपच्या माध्यमातूनही त्यांनी गोसेवेचे कार्य केले आहे. शेटिया परिवाराने त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करून गरजवंत रुग्णांसाठी चांगला उपक्रम केला आहे. डॉ. भरत जगताप म्हणाले, पूर्वी समाजामध्ये मनके विकाराच्या ऑपरेशनमुळे पायाची ताकद जाते, रुग्ण दगावतो, अशा प्रकारची भीती होती. परंतु आता प्रगत तंत्रज्ञानामुळे व उपलब्ध सोयी सुविधांमुळे दुर्बिणीद्वारे चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रिया होत आहेत.

संतोष बोथरा म्हणाले, स्व. लक्ष्मीकांत शेटिया यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान होते. जिथे कमी तिथे आम्ही याप्रमाणे समाजकार्यात नेहमी अग्रेसर असा शेटिया परिवार आहे. शेटिया परिवाराने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून स्मृती जपण्याचे कार्य केले आहे. स्मृतिदिन कसा साजरा करावा याचा चांगला पायंडा शेटिया परिवाराने पाडला आहे. डॉ. आशिष भंडारी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रकाश छल्लाणी यांनी आभार मानले.
या शिबिरात ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com