

पुणे: महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या वतीने “आरोग्यजागर” या विषयावर एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर, अवयव दान जनजागृती व्याख्यान, तसेच आपत्कालीन वैद्यकीय प्रथमोपचार (CPR) प्रशिक्षण सत्र यांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता, आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याची तयारी, तसेच अवयवदानाबद्दल सामाजिक जाणीव निर्माण करणे हा होता.