दौंड तालुक्यातील मळद येथे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू

सावता नवले
Monday, 14 September 2020

दौंड तालुक्यातील मळद येथे कोरोना संसर्गामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने व 13 जण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने दक्षता म्हणून कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिजन लेव्हल व शरीराचे तापमान तपासले जात आहे.

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील मळद येथे कोरोना संसर्गामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने व 13 जण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने दक्षता म्हणून कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिजन लेव्हल व शरीराचे तापमान तपासले जात आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

मळद येथील दोन व्यक्तींचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. तर एकूण 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामळे रूग्णांची संख्या आणखी वाढेल असे वाटत होते. मात्र ही साखळी तुटल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला. शनिवारी (  ता. 12 ) आणखी एक  जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष  लागले आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती सदस्य प्रकाश नवले यांनी बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. त्यामुळे आरोग्य विभाग, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक यांची टीम तयार करून सर्वे  व ऑक्सिजन लेवल व शरीराचे तपमान तपासात आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळयाचे वाटप करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही पॉझिटिव्ह रूग्णाना घरीच विलगिकरणात ठेवून उपचार करण्यात येत आहेत. पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींनी 14 दिवस विलगिकरणात राहून स्वता:ची व इतरांच्या आरोग्याची  काळजी घेण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस पाटील यशश्री दुधे यांनी केले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health check-up started at Malad in Daund taluka