जिल्ह्यातील "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत आरोग्य तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 5 ऑक्‍टोबर या कालावधीत राबविण्यात आला होता. या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 3 हजार 216 संशयित कोरोना रुग्ण आढळून आले होते.

पुणे - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील 14 लाख 67 हजार 279 नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 1 हजार 629 संशयित कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्या सर्वांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत केवळ 280 जणांनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी गुरुवारी (ता.22) सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारपर्यंत (ता. 21) जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 3 लाख 34 हजार 378 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यासाठी 1 हजार 305 तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून दररोज हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात 10 ऑक्‍टोबरपासून दुसरा टप्पा सुरू झाला असल्याचेही काकडे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कुटुंब आणि व्यक्तीनिहाय तपासणी करण्यासाठी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 5 ऑक्‍टोबर या कालावधीत राबविण्यात आला होता. या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 3 हजार 216 संशयित कोरोना रुग्ण आढळून आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health check-ups in the district's My Family, My Responsibility campaign