पुणे - अस्वच्छतेमुळे ७० टक्के आजार होतात. मोदी सरकारने देशात स्वच्छता अभियान राबवून व शौचालय उभारण्यासाठी अनुदान दिल्याने आजार आपोआप कमी झाले आहेत. मात्र, जे काही आजार होतात त्यांनाही आता भीती नाही कारण आता देशातील ८० कोटी नागरिकांवर ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचारांचा विमा लागू असल्याची माहिती केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली.