
पुणे : आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) म्हणजे सामान्य नागरिकांसह खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी महागड्या उपचारांच्या अनिश्चिततेच्या काळात आधाराचा हात ठरतो. मात्र, विम्याच्या हप्त्याच्या रकमेवर (प्रीमियम) लावलेला १८ टक्के वस्तू व सेवाकर (जीएसटी) हा आर्थिक भार सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. त्यामुळे आग्रहाची बाब असलेल्या आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’ पूर्णपणे माफ करण्याची मागणी सर्वसामान्यांसह स्वयंसेवी संस्थांकडून होत आहे.