पेपरफुटी प्रकरण : आरोग्य विभागातील बड्या अधिकाऱ्याला अटक

सायबर सेलची कारवाई
Exam-Paper Checking
Exam-Paper Checking

पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील वादग्रस्त भरतीतील पेपरफुटीचे धागे आता थेट आरोग्य संचालनालयापर्यंत पोहचले आहे. आरोग्य विभाग गट 'क' भरतीतील प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी मुंबईतील सहसंचालक महेश बोटले यांना बुधवारी पुणे सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलिसांकडून कसून चौकशीनंतर बुधवारी रात्री ही अटकेची कारवाई करण्यात आली.

Exam-Paper Checking
Google सर्च लिस्ट जाहीर; IPL अव्वल तर गोल्डन बॉय टॉप टेनमध्ये

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने लातूरच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय ५०) यांच्यासह पाचजणांना मंगळवारी अटक केली होती. तेव्हा मुंबईतील आरोग्य संचालयनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रश्नपत्रिका दिल्याचे बडगिरे याने पोलिसांनी सांगितले. चौकशीत आरोग्य संचालनालयातील सहसंचालक (तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान) महेश सत्यवान बोटले (वय ५३ , रा. मुलुंड, मुंबई) प्रश्नपत्रिका फोडल्या प्रकरणात सामील झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून बुधवारी अटक करण्यात आली.

प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी मिळाले १५ लाख रुपये

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेतील पथकाने बोटले यांच्या मुंबईतील कार्यालय आणि निवासस्थानाची झडती घेण्यात आली. त्यांना मुंबईतून सकाळी ताब्यात घेण्यात आले. बडगिरे याने सुरूवातीला प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी १५ लाख रुपये मिळाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याला ३३ लाख रुपये मिळाल्याची माहिती मिळाली आहे. बडगिरेने शिकवणीचालक तसेच काहीजणांना प्रश्नपत्रिका पुरवून जवळपास ८० लाख रुपये मिळवले असल्याची प्राथमिक माहिती चौकशीत मिळाली आहे.

आर्थिक फायद्यासाठी कृत्य केल्याचं उघड

आरोग्य विभागाच्या भरतीसाठी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीत महेश बोटले सदस्य होते. प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्यानंतर ती संगणकावर ठेवण्यात आली होती. त्या संगणकाची इत्यंभूत माहिती (ॲक्सेस) बोटले यांच्याकडे होता. त्यांनी प्रश्नपत्रिका पुढे लातूरमधील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेला २३ किंवा २४ ऑक्टोबरला पाठविल्याचे पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात उघड झाले त्यामुळे प्रश्नपत्रिका फोडल्या प्रकरणात ते सामील असल्याचे निश्चित झाले आहे. आर्थिक फायद्यासाठी बोटले, बडगिरे यांनी हा प्रकार केल्याचं उघड झालं आहे.

आत्तापर्यंत ११ जणांना अटक

आरोग्य विभागाचा 'ड' परीक्षेचा पेपर फुटल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. हा पेपरफुटीमधील एजंट, क्लासचालक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यापासून थेट प्रत्यक्ष पेपर फोडणाऱ्यापर्यंत पोहचण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. त्यात अनेक मोठमोठे अधिकारी सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com