Pune News : हृदयविकाराच्या रुग्णाला सहा स्टेंट टाकून प्राण वाचविण्यात यश

माणिक पाटील यांची वयाची चाळिशी उलटलेली. ते मधुमेहाच्या सीमारेषेवर होते. एक दिवशी अचानक त्यांच्या छातीत असह्य वेदना होऊ लागल्या.
Heart
Heartsakal

पुणे - माणिक पाटील यांची वयाची चाळिशी उलटलेली. ते मधुमेहाच्या सीमारेषेवर होते. एक दिवशी अचानक त्यांच्या छातीत असह्य वेदना होऊ लागल्या. काही क्षणात ते अक्षरशः घामाने डबडबले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक तपासणीनंतर त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याचे निदान झाले. त्यांचे जवळचे नातेवाईक हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार नव्हते. अखेर सहा स्टेंट टाकून त्यांच्या हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे त्यांचे प्राण वाचविण्यात पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञांना यश मिळाले.

रुग्णाची स्थिती काय होती?

नॉन-एसटी इलेव्हेशन मायोकार्डियल इनफार्शन हा एक प्रकाराचा हृदय विकाराचा तीव्र झटका आहे. तो पाटील यांना आला होता. पाटील यांना संजीवन व्हिटालाइफ मेडिपॉइंट रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या टुडी-इकोमध्येही हृदयातील दोष स्पष्टपणे जाणवत होता.

हृदयाला रक्तवाहिन्या करणाऱ्या उजव्या व डाव्या धमनीमध्ये अडथळे निर्माण झाल्याचे निदान झाले. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणारी डावी बाजू कमकुवत होऊ लागली होती. रक्तपुरवठा खंडित झाला होता. त्यातून हृदयविकाराचा झटका आल्याचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सत्यजित सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

असे केले निदान

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला स्थिर करण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी डिकंजेस्टिव्ह थेरपी वापरली. दुसऱ्या दिवशी रुग्णाला हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या, उजव्या आणि मधल्या मुख्य रक्तवाहिन्यांची तपासणी केली. त्यात या रक्तवाहिन्यांमध्ये मोठे अडथळे आल्याचे निदान झाले.

रुग्ण हा मध्यमवयीन असल्याने त्याच्या भविष्याचा विचार करून हृदयात स्टेंट बसविले. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांमध्ये रुग्ण व्यवस्थित बरा झाला. त्यानंतर त्याला घरी सोडले. आता रुग्ण पूर्ववत दैनंदिन कामे करू लागला आहे. वेळेत निदान करून त्यावर प्रभावी उपचार केल्याने या रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य झाले. उपचारानंतर अतिदक्षता विभागातील गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा आणि सांघिक प्रयत्नांमुळे रुग्ण लवकर बरा झाला.

- डॉ. सत्यजित सूर्यवंशी, हृदयरोग तज्ज्ञ, संजीवन व्हिटालाइफ मेडिपॉइंट रुग्णालय

अँजिग्राफीतील आव्हाने

  • हृदयातून जाणाऱ्या रक्तवाहिन्यांतील अडथळे दूर करण्यासाठी स्टेंट टाकले.

  • हृदयातील आणखी एका प्रमुख रक्तवाहिनीतील अडथळा काढण्यासाठी स्टेंट वापरणे धोक्याचे होते. कारण, तो अडथळा आकाराने खूप मोठा होता.

  • त्यामुळे त्या ठिकाणी ड्रग्ज इल्युटिंग बलून वापरला.

उपचाराचे कोणते पर्याय होते?

पाटील यांच्यावरील उपचाराचे वेगवेगळे पर्याय नातेवाइकांना देण्यात आले. त्यातील सर्वात पहिला पर्याय ‘सीएबीजी’चा (कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट) होता. हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेच्या पद्धतीने बंद झालेल्या रक्तवाहिनीला दुसरीकडून रक्तपुरवठा सुरू केला जातो. दुसरा पर्याय, अँजिओप्लास्टीचा होता. त्यात मोठी जोखीम होती. कारण, मल्टिव्हेसल अँजिओप्लास्टी करावी लागणार होती. बायपास शस्त्रक्रियेऐवजी रुग्णाच्या नातेवाइकांनी अँजिओग्राफीचा पर्याय निवडल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com