
पुणे : शहरात सोमवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मंगळवारी कोरेगाव पार्क, लवळे आणि लोहगाव येथे प्रत्येकी एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील आठवडाभरात कमाल व किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.