विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उष्णतेची लाट
विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट

विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट

पुणे : विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याची अनुभूती बुधवारी राज्यातील चाळीशीपार गेलेल्या तापमानावरून आली आहे. कोकण वगळता राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरी ४३ अंशावर होते. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

मार्च महिन्यापासून राज्यातील उष्णतेचा पारा कायमच वाढत आहे. कधी उन्हाच्या झळा तर कधी अवकाळी पाऊस, यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पारा ४३ अंशांच्या वर पोचल्यामुळे उन्हाचे चटके असह्य झाले आहेत. विदर्भासह राजस्थान आणि मध्यप्रदेशातही उष्णतेची लाट आली असून, पुढील पाच दिवस ही स्थिती कायम राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सर्वाधिक सरासरी कमाल तापमान असलेली ठिकाणे (अंश सेल्सिअस)

 • ब्रह्मपुरी : ४५.१

 • वर्धा : ४५

 • अकोला, नागपूर : ४४.८

 • चंद्रपूर : ४४.६

 • गोंदीया : ४३.८

महत्त्वाच्या शहरांमधील सरासरी कमाल तापमान ( अंश सेल्सिअस) :

 • मुंबई : ३४.५

 • पुणे : ४१.३

 • नाशिक : ४१.०

 • औरंगाबाद : ४२.१

 • रत्नागिरी : ३५.७

 • सांगली : ४०.२

Web Title: Heat Wave Vidarbha Next Five Day Average Maximum Temperature Recorded 43 Degrees Celsius Most Parts State Wednesday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top