Pune Garbage Issue : कचरा प्रकल्पावरून स्थायी समितीमध्ये घमासान; सत्ताधारी व विरोधकांकडून प्रश्‍न उपस्थित

पुणे शहरातील कचरा प्रश्‍न गंभीर झाला असून, सध्याचे प्रकल्प कमी क्षमतेने चालत असल्याने कचरा जिरवणे अवघड जात आहे.
Pune Garbage Project

Pune Garbage Project

sakal

Updated on

पुणे - मोशी दुर्घटनेत गुन्हा दाखल झालेल्या कंपनीची उपकंपनी अँटोनी लारा एनव्हायरो सोल्यूशन प्रा. लि. कंपनीला पुण्यातील निविदेत पात्र ठरविणे, पुण्यातील ५०० टन कचऱ्याच्या निविदेत भूमीग्रीन कंपनीला काम मिळणे व त्याच्या दरावरून स्थायी समितीच्या बैठकीत आज (ता. १६) जोरदार घमासान झाले. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना प्रशासन समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्याचा फटका ३०० टन सुक्या कचऱ्याच्या निविदेला बसला असून, हा प्रस्ताव एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com