बारामती - गेल्या दोन दिवसातील अतिवृष्टीने महावितरणच्या बारामती मंडलातील सहा उपकेंद्रांना व त्यांतर्गत 10 उच्चदाब वाहिन्यांना फटका बसला. लघुदाबाचे 657 तर उच्चदाबाचे 267 असे 924 खांब जमीनदोस्त झाले आहेत. .महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर सर्व उपकेंद्रांचा वीजपुरवठा काही तासांतच पूर्ववत करण्यात यश आले आहे. अद्याप 2113 बिगरशेती ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. तो पूर्ववत करण्यासाठी वीज यंत्रणा अहोरात्र झटत आहे. मुख्यालय व परिमंडलातील ‘वॉर रुम’ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत..महावितरण बारामती मंडलात पुण्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, पुरंदर व भोर या सहा तालुक्यांचा समावेश आहे. बारामती विभागातील लोणी देवकर, भिगवण, सणसर, काळेवाडी तर केडगाव विभागातील देऊळगाव व मलठण उपकेंद्रांना फटका बसला. या सर्व उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे..अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे, फांद्या पडल्याने तारा तुटल्या. यंत्रणा सतर्क असल्याने वीज अपघात घडला नाही.बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती मंडलाचे अधीक्षक अभियंता दिपक लहामगे वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ‘वॉर रुम’ व नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत आहेत..वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लागणारे साहित्य, वीजेचे खांब, रोहित्र व ऑईलचा मुबलक पुरवठा सर्व विभागांना करण्यात आलेला आहे. तसेच सर्व वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयात व मोबाईलवर उपलब्ध राहण्याचे आदेशही महावितरणने दिले आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.