

Monsoon Magic in Mulshi: Dam Water Levels Increase, Waterfalls Flow, Tourism Picks Up
sakal
माले: मुळशी धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसामुळे मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर निसर्गसौंदर्य खुलल्याने वर्षाविहारासाठी पर्यटकांनी मुळशी धरण परिसरात मोठी गर्दी केली आहे.