

One killed and seven injured in a three-vehicle collision on Pune-Nashik highway near Narayangaon
Sakal
नारायणगाव : पुणे -नाशिक महामार्गावर कोठारी मारुती शोरूम समोर तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात गोळेगाव(ता. जुन्नर ) येथील अभियंता असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीसह सात जण जखमी झाले.हा अपघात आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींना उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.