खराडी - पुण्याच्या पुर्व भागात झालेल्या जोरदार पावसामुळे मुंढवा-खराडी परिसरातील रस्त्यावर पाणी साठले आहे. तसेच पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवघेणी वाहतुक कोंडी झाली आहे. नगर रोडवरील रामवाडी ते खराडी बायपास ते मुंढवा महात्मा फुले चौकापर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कोंडीत अडकून राहावे लागले.