
पुणे : शहरात मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले होते. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पावसाळी गटारे, सांडपाणी वाहिन्यांची सफाई दोन महिने आगोदरच सुरू केल्याचा महापालिका प्रशासनाने केलेला दाव मंगळवारी झालेल्या पावसाने खोटा ठरविला. पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी रस्त्यांवर तुंबले. रस्त्यावर साठलेल्या पाण्यातुन वाट काढताना अनेक दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रकार घडले.