
हिंजवडी : जोरदार पावसाने आयटीनगरी हिंजवडी पाण्याखाली गेली. आयटीच्या रस्त्यावर अवतरलेल्या ‘नद्यां’ बाबतचे वृत्त आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. एमआयडीसी व पीएमआरडीए प्रशासनावर नागरिकांकडून टीकेची झोड उठल्यावर एमआयडीसी प्रशासनाने रविवारी सकाळपासून माणमधील जुन्या नळकोंडाळ्यांची तसेच ओढ्या-नाल्यांची साफसफाई करत पावसाळी पाणी वाहून जाण्याचे प्रवाह पुनर्जीवित केले. मात्र, ही तात्पुरती डागडुजी नको.