घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस

घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस
Published on

घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस

कुकडी धरणसमूहात ९७ टक्के पाणीसाठा; मुळशी धरणक्षेत्रात ५५ मिलिमीटरची नोंद

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-अधिक होत असला तरी घाटमाथ्यावर पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी सुरूच आहेत. मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंत मुळशी धरणक्षेत्रात ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर धरणक्षेत्रांतही तुरळक सरी सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोणावळा, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण आणि कुंडली या घाटमाथ्यावरील भागांत पाऊस सुरू आहे. लोणावळा येथे ४० मिलिमीटर, कुंडली २४, शिरोटा २० आणि वळवण येथे १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुठा खोऱ्यातील धरणक्षेत्रांत हलका ते मध्यम पाऊस झाला. टेमघर येथे २४ मिलिमीटर पाऊस झाला, तर वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणक्षेत्रात तुरळक सरी पडल्या.
नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी आणि नीरा देवघर धरणक्षेत्रांत पावसाचा शिडकावा झाला. चासकमान, शेटफळ, नाझरे, भाटघर आणि वीर धरणक्षेत्रांत मात्र पावसाची उघडीप होती. कुकडी धरणसमूहातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव आणि डिंभे धरणक्षेत्रांत तुरळक पाऊस झाला. वडज, चिल्हेवाडी आणि घोड धरणक्षेत्रांत ढगाळ वातावरण होते. विसापूर आणि उजनी धरणक्षेत्रांत काही वेळ ऊन, तर काही वेळ ढगाळ वातावरण राहिले. झालेल्या पावसामुळे मागील २४ तासांत धरणसमूहात २.४१ टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली आहे. सध्या धरणांमध्ये १९३.१३ टीएमसी म्हणजेच ९७ टक्के उपलब्ध पाणीसाठा आहे.

चौकट ----
मंगळवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणनिहाय सुरू असलेला विसर्ग (क्युसेकमध्ये)
टेमघर ८४२
वरसगाव ६००
पानशेत ६००
खडकवासला ३४१५
पवना ८००
कळमोडी २११
चासकमान ७००
आंध्रा २११
वडिवळे ५०२
नाझरे २९१
गुंजवणी २५०
भाटघर १२३६
नीरा देवघर ७५०
वीर ३४००
पिंपळगाव जोगे २००
येडगाव १४००
वडज १००
डिंभे ७००
घोड ५०००
विसापूर ७०
उजनी ३७००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com