
आळंदी : मावळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आळंदीतील इंद्रायणीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी इंद्रायणी काठी पाहणी करून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.