
पुणे : शहरात मध्यरात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्रीपर्यंत १३ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. काही भागांमध्ये फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, सुदैवाने या घटनांमध्ये कुणालाही इजा झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यांवर अडथळा झालेल्या झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली.