esakal | पुणे : गणेशोत्सवानंतर वरुणराजाची दमदार हजेरी । Rain
sakal

बोलून बातमी शोधा

rain

पुण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री: गणेशोत्सवामध्ये दांडी मारल्यानंतर आज (सोमवार, दि. ४ ऑक्टोबर) सहाच्या सुमारास आकाशामध्ये काळेकुट्ट ढग दाटून आले. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा, ढगांच्या गडगडाटासह वरुणराजाने दमदार हजेरी लावली. रस्ते जलमय झाल्याने दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. चारचाकी वाहनचालकांनीही सावध पवित्रा घेत वाहनांचा वेग कमी ठेवून घर गाठण्यासाठी लगबग सुरू असल्याचे दिसून आले. (Pune Rain Update)

हेही वाचा: पुणे: सहकार चळवळ एकत्रितरीत्या वाढवूया

काळेकुट्ट आभाळ भरून आले होते, तर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे मंतरवाडी-कात्रज बायपास रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावला होता. भाजीविक्रेत्यांसह खरेदीदार आणि चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेकांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावून थांबणे पसंत केले होते. दुकान, हॉटेल्स, चहा टपरीचा अनेकांनी अडोसा घेतला. वडकी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, उंड्री, पिसोळी, मंतरवाडी, औताडेवाडी आदी परिसरात जोरदार पाऊस पडल्याने परिसर जलमय झाला होता, असे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवृत्ती बांदल यांनी सांगितले.

loading image
go to top