Pune Rain Update : धानोरी, विश्रांतवाडीसह येरवडा परिसरात मुसळधार; पावसामुळे रस्त्याला आले नदीचे स्वरूप

अनेक नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरले.
Pune Rain Update
Pune Rain Update esakal

विश्रांतवाडी : धानोरी, विश्रांतवाडी येरवडा परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. पाणी अतिशय वेगाने वाहत असल्यामुळें अनेक दुचाकीस्वार पडले, गाड्या बंद पडल्या. अनेक नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरले.

Pune Rain Update
Nashik Crime News : आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या चोरट्यांकडून 22 मोबाईल जप्त

येरवडा भागातील सरगम हॉटेलसमोर दुसऱ्याच पावसामुळे तलाव निर्माण झाल्याने प्रवाशांची, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.. दोन ते अडीच फूट पाणी भरल्याने अनेक मोटारगाडी बंद पडल्या. कामावरून घरी जाणारे प्रवासी या वाहतूक कोंडीमध्ये जवळपास दोन तास अडकून पडले. येथील रहिवासी मनोज शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते गणेश घायमुक्ते, उमेश शेट्टी यांनी बंद गाड्यांना धक्का देत बाहेर काढले, तर अनेक प्रवाशांना रस्ता काढून दिला

Pune Rain Update
Nashik News : मालेगाव- नामपूर रस्ता बनला अपघाताचा केंद्र; दर 2-4 दिवसांनी अपघात

येरवड्यात साचलेल्या पाण्याच्या बाजूलाच क्षेत्रिय कार्यालय आहे. या समस्येसाठी दोन वर्षांपासून चालवणारे प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत की प्रभागातील चार माजी नगरसेवक असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

धानोरीतील गोकुळनगर, विद्यानगर भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तर येरवडा परिसरातील यशवंतनगर, नेताजीनगर, भाटनगर, जनतानगर येरवडा परिसरातील यशवंतनगर, नेताजीनगर, भाटनगर, जनतानगर, तसेच विश्रांतवाडीमधील भीमनगर येथे मोठ्या पाण्यामुळे सांडपाणी वाहिन्यांमधून बाहेर येऊन पाणी नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भाटनागर येथील रहिवासी कीर्ती माचरेकर म्हणाले की जवळपास १५० लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. लोकांच्या घरातील वस्तू, राशन वाहून गेले. प्रतीकनगर येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाड पडले. त्यामुळे तेथील रस्ता बंद झाला. प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचे फार हाल झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com