

करमाळ्याच्या पश्चिम भागाला
पावसाचा जोरदार तडाखा
केत्तूर, ता. २ ः करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील टाकळी, कोढार चिंचोली, कात्रज, रामवाडी परिसरात सोमवारी (ता.२) पहाटेपासून सकाळपर्यंत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसामुळे परिसरातील शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, काही ठिकाणी शेतांमधून पाण्याचे प्रवाह वाहू लागले आहेत.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. विशेषतः ऊसतोडणी हंगाम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने ऊसतोडणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. शेतातील रस्ते चिखलमय झाल्याने ऊस वाहतूक करणारी वाहने शेतापर्यंत पोहोचणे अशक्य झाले आहे. त्यामुळे ऊसतोडणी बंद ठेवण्याची वेळ शेतकरी व ऊसतोड कामगारांवर आली आहे. पावसामुळे ऊसतोडणी आणि वाहतुकीचे वेळापत्रकही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ऊस तोडणी कामगारांच्या कोपामध्येही पाणी शिरले आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांची मात्र तारांबळ झाली. तालुक्याच्या इतर भागात मात्र दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. परतीच्या पावसाने देशातून माघार घेतली असली तरी यापुढे पडणारा पाऊस वादळी पाऊस असणार आहे असे हवामान खात्याकडून ठेवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.