Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला; खडकवासला धरणातून विसर्ग सुरू
Monsoon Update : पुण्यात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला असून, शहरात वाहतूक कोंडी व पाणी साचल्याचे प्रकार घडले.
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, गुरुवारी पहाटेपासून जोरदार सरी बरसल्या. पुणे शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचण्याचे तसेच काही ठिकाणी झाडपडीचे प्रकार घडले आहेत.